भेगाळलेली देशभक्ती
- Akash Jagtap
- Sep 27, 2018
- 1 min read
#कविता
रक्त वाहते सीमेवर पण, देशामध्ये जाणवत नाही,
रोग पसरवी वारा पण, देशभक्ती पसरवत नाही
कायद्याच्या चौकटीतल्या, भेगा काही बुजत नाहीत,
रोज नवा कायदा तरी, न्याय जुनाही मिळत नाही
तडे किती गेले देशास, वेदना कुणास होत नाही,
जिभेवरली देशभक्ती कृतीत अवतार घेत नाही,
सत्य कळते उशिराने, अफवा उशीर लावत नाही,
दुसऱ्याच्या बदनामीतले, षडयंत्र हे दिसत नाही,
देशभक्तीचे चित्रपट, थिएटर बाहेर दिसत नाही,
प्रत्यक्षातला सिंघमदेखील, जयकांत समोर टिकत नाही
देवसुद्धा लाचखोर का? मनात प्रश्न कमी नाही
भक्ती करावी कोणाची? वादाशिवाय देव नाही
-आकाश
Comments