निवांतपणा
- Akash Jagtap
- Sep 26, 2018
- 1 min read
निवांतपणा
मला निवांतपणा हवा,
तिला हवे लवकर प्रमोशन,
मी आजचे ढकलले उद्या सारे,
तिला हवे सारे पटकन
तिने वयानुसार गोष्टी ठरवल्या,
मला उद्याचेच ठाऊक नाही,
तिच्यासाठी मी बेजबाबदार,
माझ्यासाठी तीही चूक नाही
खरंच नातं म्हणजे केवळ प्रेम,
की आणखी जबाबदारी मोठी,
जबाबदारी चे ओझे वाहताना,
प्रेमसुद्धा टिकेल का ओठी
लवकर सगळे यश मिळवताना,
कुठेतरी हे चित्त थांबेल का?
सगळे मिळून निवृत्त होताना,
सगळंच मिळालंय असं वाटेल का?
आपली स्वतःची कमाई वाढताना,
अहंकार कसा वाढणार नाही?
कमाईत वाढणार आकडा तो,
वेळेत कसा घटणार नाही
तिने निवडलाय मार्ग आज जो,
तिच्यासोबत मी ही निवडू का?
प्रवाहासोबत जाण्यासाठी,
हा निवांतपणा सोडू का?
-आकाश
Comments