नातं कसं असावं
- Akash Jagtap
- Sep 27, 2018
- 1 min read
विसरून जाऊ जग सगळे,
अशी संगत असावी,
विसरणार नाही जग कधीही,
अशी रंगत चढावी
जाणीवा न राहाव्या कसल्या,
असे रसायन बनावे
तहान न राहावी पुन्हा,
असे प्राशन करावे
नजर नजरेस मिळता,
ठिणगी अशी निघावी
ठिणगीचा वणवा व्हावा,
तरीही खबर नसावी
युगे निघून जावी सोबत,
दोघांना न कळावी
दूर झाल्यावर मात्र,
घटका ही न सरावी
श्रीमंतीची गरज नको पण,
सोबतीची आस असावी
संसाराची गाडी मात्र,
रस्त्याकाठी निवांत असावी
-आकाश
Comentários