वादळ
- Akash Jagtap
- Sep 27, 2018
- 1 min read
वादळ
बोलायचे परंतु, दाटलेला कंठ आहे
वादळातला दिवा मी, अजूनी जीवंत आहे
शेतात काळी माय, झाली भेसूर होती
मग गारपीट आली, बनूनी असुर होती
सरकार कान झाके, दुःखे बेसूर होती
आशेचा नव्हता सूर्य, क्षितिजेही दूर होती
मंत्रीजनांचे दौरे, हे हस्तिदंत आहे,
वादळातला दिवा मी अजूनी जीवंत आहे
पडले आभाळ जेव्हा, नासले पीक होते
सरकारचे पॅकेज, संख्येत ठीक होते
पोहोचले जेव्हा हाती, भासले भीक होते
नासले खरे तेव्हा, मानवतेचे पीक होते
सळसळते रक्त आता, वाहते संथ आहे
वादळातला दिवा मी, अजूनी जीवंत आहे
माझी कितीक मरने, पिकांच्या संगे झाली
कळले मलाच माझे, जाण्याची वेळ आली
तेवणार दिवा किती, वादळ हे शक्तिशाली
आशेची ही विमाने, कोसळली आज खाली
राजकारण्यांची येथे वादळे अनंत आहे,
वादळातल्या दिव्याचा, येथेच अंत आहे
-आकाश
Komentarze