कविता
- Akash Jagtap
- Sep 27, 2018
- 1 min read
एकाच वाटेवर चालत आलो,
आजपर्यंत तू आणि मी,
आज बदललीस वाट तुझी,
पण नको करू प्रयत्न,
त्या पाऊलखुणा मिटवण्याच्या,
हरशील!
चन्द्र वेगळा जो भासला तुझ्यासोबत,
आज झालाय निस्तेज,
पण तेव्हा दुसऱ्या चंद्राचा,
जो शितल प्रकाश
कायमचा बसलाय डोळ्यांत,
तो हिरावण्याचा प्रयत्नही करू नकोस,
हरशील!
तुझा निर्णय घेऊन झालीस मोकळी,
हक्क आहेच तुला,
पण माझा निर्णय तू घेऊ नकोस,
हक्क जरी असला तुला तरी,
कारण प्रेम तर मरत नाही,
उलट वाढवशील गुंता भावनांचा,
म्हणून घेऊ नकोस निर्णय माझा,
गुंतशील!
-आकाश😉
Comments